परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरीदिनांक 12 (जिमाका) :-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्यविभागामार्फत अनुसूचित जाती, प्रवर्गातील 75 विद्यार्थ्यांना(मुला-मुलीना) दर वर्षी परदेशामध्ये अध्ययनासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजशिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. या योजनेसाठीजिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचेआवाहन समाज कल्याणचे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संतोषचिकणे  यांनी केले आहे.सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाची प्रक्रीया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांकडून परदेशशिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्याप्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी. साठी अद्ययावत (Qx WorldUniversity Ranking) 200 च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्येप्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूरकरण्यात येते. त्यापैकी 30 टक्के जागावर मुलीचीगुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी विहीत नमुन्यातील अर्जशासनाच्या www.maharashtra.gov.in  या अधिकृतसंकेतस्थळावरील ताज्या घडमोडी या लिंकवरुन डाऊनलोड करुन घ्यावा.  परिपूर्ण भरलेले अर्ज https://fs.maharashtra.gov.in  यावेबसाइटवर वाचनीय व सुस्पष्ट कागदपत्रे ऑनलाईन सादर करुन त्याची सुस्पष्ट प्रिंट,ऑफलाईन नमून्यातील अर्जासोबत समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयास दिनांक 30 एप्रिल 2025 अखेर अर्ज सादर करावे. यायोजनेसाठी पात्र असण्याऱ्या विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेची शिक्षण फी, निर्वाह भत्ता,आकस्मिक खर्च याचा लाभ मिळणार आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35वर्ष व पीएचडीसाठी 40 वर्ष ही कमाल वयोमर्यादा असेल. भारतीय आयुविज्ञान परिषदेच्यासंकेतस्तळावरील MD व MS अभ्यासक्रमचप्रवेशासाठी पात्र असतील. अधिक माहितीसाठी संकेतस्तळास भेट द्यावी. योजनेच्या अधिकमाहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालय दूरध्वनी क्र.०२३६२-२२८८८२येथे संपर्क साधावा.००००० 

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'