अनंत मुस्कान अंतर्गत सहविकसन कार्यशाळा संपन्न

सिंधुदुर्गनगरी दिनांक 11 (जिमाका) :- हेलिस सेखसरिया इन्स्टिटयूट ऑफ पब्लिक हेल्थ, नवी मुंबई यांच्यावतीने अनंत मुस्कान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी 'सहविकसन कार्यशाळा' जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात येथे संपन्न झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली आहे. 'अनंत मुस्कान' भारतातील प्राथमिक शाळांमध्ये ब्रशने दात घासणे आणि तोंडाचे आरोग्य शिक्षण याबद्दल विविध राज्यांतील काही जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी करत आहे. या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधींची उपस्थिती कार्यशाळेस लाभली होती. या कार्यशाळेसाठी डॉ. उमेश शिरोडकर (Deputy director oral health, public health department maharashtra) हे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सहअध्यक्ष जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, अतिरिक्त जिल्हा शिक्षण अधिकारी रामचंद्र अंगणे, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, संचालक, हेलिस डॉ. मंगेश पेडणेकर आणि डॉ. खुशबू शर्मा (कार्यक्रम प्रमुख, अनंत मुस्कान) श्रीम.अक्षता गोजे (project Research scientist) डॉ.संजिनवी शेटे (Project Research scientist) यांची उपस्थिती होती. कार्यशाळेमध्ये तालुका आरोग्य अधिकारी, NOHP दंत शल्य विशारद, क्लस्टर अधिकारी, RBSK समन्वयक, १० समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), तसेच कुडाळ आणि वेंगुर्ला तालुक्यातील २० शिक्षक व मुख्याध्यापक व Healis Team यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमा अंतर्गत शालेय मुलांमध्ये तोंडाच्या आरोग्यविषयी जागृती निर्माण करण्यासाठी ब्रशने दात घासण्याच्या सरावाची अंमलबजावणी तसेच मुलांना आणि पालकांना तोंडाचे आरोग्य शिक्षण सत्र चालू केले आहे. आरोग्य आणि शिक्षण विभाग यांचा सहभाग, तसेच कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी आवश्यक सहकार्य यावर सखोल चर्चा करण्यात आली. हेलिस टीमने पुढील वर्षाच्या कार्यक्रमासाठी उद्दिष्टे, अंमलबजावणी योजना आणि प्रशिक्षण प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. उपस्थितांनी कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपयुक्त सूचना आणि आपल्या भूमिका मांडल्या.अनंत मुस्कान कार्यक्रम हा मुलांच्या आरोग्यसंबंधित समस्यांवर प्रभावी उपाय ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. 0000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'