मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार बंद

सिंधुदुर्गनगरी : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता निवडणूक कार्यक्रम दिनांक 16 मार्च 2024 रोजी जाहीर झाली असून 46 रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी दि. 7 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. जिल्ह्यातील ज्या-ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरविण्यात येतो, त्या-त्या ठिकाणी मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदान सुरळीतपणे पार पाडावे, याकरीता कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मतदान दिवशी भरविण्यात येणारा आठवडा बाजार बंद ठेवण्याकरीता मंगळवार दि.7 मे 2024 रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील खाली नमूद केलेले आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी निर्गमित केल आहेत. तसेच या दिवशी भरविण्यात येणारे आठवडा बाजार अन्य दिवशी भरविण्यास अनुमती देण्यात आलेली आहे. अ.क्र तालुका दि. 7/5/2024 रोजी मतदान दिवशी आठवडा बाजार बंद करण्याचे गावाचे नाव 1 कुडाळ माणगांव, वालावल 2 सावंतवाडी सावंतवाडी (शहर), चौकुळ 3 वेंगुर्ला होडावडा 4 कणकवली कणकवली (शहर), तळेरे 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'