मतदान जनजागृतीच्या एलएईडी रथास जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवा झेंडा • 'स्वीप' अंतर्गत उपक्रम •जिल्हाभर करणार जनजागृती
सिंधुदुर्गनगरी दि.20(जिमाका): लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून मतदान जनजागृतीसाठी एलईडी चित्ररथ तयार करण्यात आले आहेत. एलएईडी रथाचे आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती,उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, संदीप शिंदे आदी उपस्थित होते.
या एलईडी रथाद्वारे मतदान जनजागृतीच्या चित्रफिती, नागरिकांनी मतदान करावे यासंदर्भातील जिंगलस दाखविल्या जाणार आहेत. निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीच्या या उत्सवात जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घ्यावा, यासाठी मतदार जनजागृती करण्यात येत आहे. या रथाद्वारे जिल्ह्यातील तीनही मतदार संघात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाणार आहे.
००००००
Comments
Post a Comment