केंद्रीय सैनिक बोर्डाच्या ऑनलाईन प्रकरणाची पडताळणी
सिंधुदुर्गनगरी, दि.20 (जि.मा.का): जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नी यांनी सन 2023-24 ची शैक्षणिक प्रकरणे के. एस. बी. (KENDRIYA SAINIK BOARD) ला ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याची On Line Site दिनांक 01 एप्रिल पासुन सुरू असल्याची माहिती सहाय्यक सैनिक जिल्हा कल्याण अधिकारी यांनी दिली आहे.
तरी पात्र माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नी यांनी आपली के. एस. बी. प्रकरणे (जसे की पाल्यांची 1 ली ते 9 वी पर्यंतची शैक्षणिक प्रकरणे 10 वी ते 12 वी ची शैक्षणिक प्रकरणे, PM Scholarship, Penury Grant व मुलीचा विवाह) केंद्रिय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांनी दिलेल्या निर्धारीत वेळेतच सादर करावयाचे आहे.
संबधित माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नी यांनी प्रकरण सादर करताना पुढील दक्षता घ्यावयाची आहे. अर्जात सर्व माहीती केंद्रिय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांनी दिलेल्या नमुन्यात भरावयाची आहे.अर्जात सर्व माहीती पुर्ण भरावयाची आहे. सर्व मुळ कागदपत्रे Upload करावी. कोणत्याही प्रकारची Zerox Upload करू नये. प्रकरण सादर करताना ऑनलाईन पध्दतीने स्वत: Upload करावी अथवा ज्या Net Cafe ला सदर बाबत माहीती आहे किंवा त्यांनी यापुर्वी अशी प्रकरणे केलेली असल्यासच त्यांच्याकडुन प्रकरणे करुन घ्यावीत.
संबधित माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नी यांनी प्रकरण सादर केल्यानंतर सैनिक कल्याण विभाग, पुणे यांचे पत्रा नुसार खालीलप्रमाणे कार्यवाही करावयाची आहे.
On Line Site वर Upload केलेला अर्ज घेऊन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,सिंधुदर्ग येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष हजर राहणे आवश्यक आहे. येताना Upload केलेल्या अर्जासोबत सर्व मुळ कागदपत्रे सोबत आणावीत. (जसे की Discharge Book, Identity Card, PPO, Aadhar Card, Declaration Certificate, Bank Pass Book, Mark List). या कार्यामार्फत संबधित माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नी यांच्या समोरच त्यांचा अर्ज ऑनलाईन पध्दतीने तपासुन सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्याकडे पाठविण्यात येईल. कोणत्याही परीस्थीतीत मौखिकरित्या किंवा दुरध्वनीव्दारे कळवुन सदरची प्रकरणे तपासली जाणार नाहीत यांची नोंद घ्यावी. तसेच निर्धारीत वेळेत प्रकरणातील त्रुटींची पुर्तता न केल्यास किंवा प्रकरण रद्द झाल्यास संबधित लाभार्थी त्यास जबाबदार राहील यांची नोंद घ्यावी.
तरी पात्र माजी सैनिक /माजी सैनिक विधवा पत्नी यांनी सदरबाबत या कार्यालयाला सहकार्य करुन या योजनांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. 02362-228820 वर संपर्क करावा असे, आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment