परमहंस भालचंद्र महाराज संस्थांनच्या विकासकामांचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि.- 28 : जिल्हा वार्षिक योजना (पर्यटन ) अंतरग्त निधीतून झालेल्या परमहंस भालचंद्र महाराज संस्थांनच्या विकास कामांचे भूमिपूजन आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, संस्थांनचे अध्यक्ष सुरेश कामत, व्यवस्थापक विजय केळूसकर, सतीश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्या समोर कायमस्वरुपी भव्य मंडप उभारणे यासह संस्थानच्या विकास कामांसाठी पर्यटन अंतर्गत जिल्हा नियोजनच्या माध्यमातून निधी देण्यात आला आहे. या विकास कामांचे आज भूमिपूजन झाले. * सोबत फोटो जोडला आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'