मोटार वाहन निरिक्षक यांचा
माहे सप्टेंबर 2020 चा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 30 :- सिंधुदुर्ग प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक यांचा सप्टेंबर 2020 मध्ये तालुकानिहाय दौरा पुढीलप्रमाणे आहे. 3 सप्टेंबर 2020 रोजी सावंतवाडी, 4 सप्टेंबर 2020 रोजी मालवण, 8 सप्टेंबर 2020 रोजी कणकवली, 9 सप्टेंबर 2020 रोजी देवगड, 10 सप्टेंबर 2020 रोजी वेंगुर्ला, 16 सप्टेंबर 2020 रोजी दोडामार्ग, 17 सप्टेंबर 2020 रोजी कुडाळ, 18 सप्टेंबर 2020 रोजी वैभववाडी असा आहे.
या दौऱ्याच्या ठिकाणी शिकाऊ व पक्की अनुज्ञप्ती, वाहनाची अनुज्ञप्ती, सार्वजनिक वाहनांची बिल्ले संबंधी चाचणी सारथी 4.0 वर ऑनलाईन पध्दतीने भरलेले विहित नमुन्यातील अर्ज सकाळी 10.00 ते 1.00 वाजेपर्यंत स्विकारण्यात येतील. तरी अर्जदारांनी मास्क, हातमोजे व स्वत:चे सॅनिटाझर घेऊन कार्यालयात यावे. कोविड 19 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन करावे.
वरील तारखांना कोणतीही सुट्टी आल्यास सदर ठिकाणचा दौ-या इतर ठिकाणचा दौऱ्या आटोपल्यावर लगेच कामाच्या दुस-या दिवशी होईल. अर्जदारांनी गैरसोय टाळण्यासाठी वेळेत उपस्थित राहून या सेवेचा लाभ घ्यावा. असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी केले आहे.
00000
वृत्त क्र. 1064
कणकवली तालुक्यातील कलमठ-गोसावीवाडी येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 30 :- कणकवली तालुक्यातील कलमठ-गोसावीवाडी येथील मिलींद पाटील हे रहात असलेले घर व (50 मीटर) (Location16.2664N 73.7039)चा परिसर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तूविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे – जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कणकवलीच्या उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत.
00000
वृत्त क्र. 1065
कणकवली तालुक्यातील कासार्डे- आनंदनगर येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 30 :- कणकवली तालुक्यातील आनंदनगर येथील इंद्रजित पंढरीनाथ महाडीक (महाडीक कॉम्पलेक्स) हे राहात असलेले घर (Location16.4403N 73.6676)चा परिसर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तूविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे – जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कणकवलीच्या उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत.
00000
Comments
Post a Comment